तिरुपती – आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिराला एका महिलेच्यावतीने तिच्या कुटुंबीयांनी ९.२ कोटी रुपयांचे दान दिले आहे. यामध्ये ३.२ कोटींची रुपयांचे डिमांड ड्राफ्ट आणि ६ कोटींच्या मालमत्तेचा समावेश आहे.चेन्नईतील ७६ वर्षीय दानशूर महिला भाविकाचे निधन झाले असून तिने आपली संपत्ती तिरुपती बालाजी मंदिराला दान केली होती. डॉ.पर्वतम असे त्या महिलेचे नाव आहे.
पेशाने डॉक्टर असणार्या पर्वतम तिरुपती बालाजीच्या निस्सीम भक्त होत्या. त्यांनी लग्न केले नव्हते. आपली सर्व संपत्ती तिरुपती मंदिराला दान करण्याची त्यांची इच्छा होती. डॉ. पर्वतम यांच्या इच्छेनुसार बहीण रेवती विश्वनाथम यांनी मुलांसाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या निर्मितीसाठी देवस्थान समितीच्या अध्यक्षांकडे दान केलेल्या रकमेतील ३.२ कोटी रुपये सोपविले. दरम्यान, तिरुपती बालाजी मंदिराला दरवर्षी भाविकांकडून कोट्यवधी रुपयांचे दान केले जाते. गेल्यावर्षी २२२१ मध्ये ८३३ कोटी रुपये देवस्थान समितीकडे जमा झाले होते.