माजलगाव – तालुक्यातील पवारवाडी येथे जय महेश शुगर्सच्या बगँस डेपोला रविवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत ५ हजार मे. टन बगँस जळुन खाक झाला.या आगीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथे खाजगी तत्त्वावर चालू असलेल्या जय महेश शुगर्स या साखर कारखान्यातील बगँस डेपोला रविवारी दुपारी १२ वाजता अचानक आग लागली. या आगीमुळे परिसरात धुर पसरला होता. ही आग विजवण्यासाठी या कारखान्याच्या यंत्रणेसह पाथरी, बीड, सोळंके कारखाना, माजलगाव नगर पालिकेच्या अग्निशमन दलामुळे ही आग तीन तासात अटोक्यात आली.
या आगीत ५ हजार मे.टन बगँस जळुन खाक झाला. यामुळे कारखान्याचे ५० लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती या कारखान्याचे उपाध्यक्ष गिरीश लोखंडे यांनी दिली. ही आग कशामुळे लागली याची माहिती मिळू शकली नाही तरी ही आग शॉर्ट सर्किटमुळे झाली असल्याचे कारखान्याच्या वतीने सांगण्यात येत आहे.