नवी दिल्ली : जर्मनीचा माजी टेनिसपटू बोरिस बेकर यांची गुरूवारी १६ डिसेंबरला ब्रिटनच्या तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. बोरिस बेकर यांच्या वकिलाने ही माहिती दिली आहे. अडीच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठवण्यात आली होती. मात्र, आठ महिन्याचा तुरुंगवास भोगल्यानंतरच त्याची सुटका करण्यात आली आहे.
बोरिस यांना इंग्लंडमधील तुरुंगात ठेवण्यात आले होते. आठ महिन्यांच्या शिक्षेदरम्यान त्यांना अनेकदा वेगवेगळ्या तरूंगात हलवण्यात आले होते. सुटकेपूर्वी ते ऑक्सफर्डशायरच्या हंटरकॉम्बे तुरुंगात कैद होते. तुरूंगातून सुटका केल्यानंतर बोरिस यांना त्यांच्या मायदेशी जर्मनीला परतणार आहेत. बोरिस यांना २१ जून २०१७ रोजी दिवाळखोर घोषित करण्यात आले. लंडनच्या साउथवार्क क्राउन कोर्टानं बोरिसला चुकीच्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीने मालमत्ता गोळा केल्या प्रकरणी एप्रिलमध्ये तुरुंगवासाची शिक्षा ठोठवण्यात आली. बोरिस हे २०१२ पासून इंग्लंडमध्ये राहत असल्याने त्यांना तिथल्याच तुरुंगात ठेवण्यात आले होते. तुरूंगातुन सुटका झाल्यांनतर बेकरजर्मनीला परतले आहे. याबाबत त्यांचे वकील क्रिस्टियन ओलिवर मोसर यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “बेकरने आपली शिक्षा भोगली आहे आणि दंड संहितेनुसार जर्मनीमध्ये त्यांच्यावर कारवाई केली जाणार नाही”.
दरम्यान, द गार्डियननं दिलेल्या वृत्तात टेनिस चॅम्पियनला इंग्लंडमधून हद्दपार केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण ते ब्रिटीश नागरिकत्व नसलेला परदेशी नागरिक आहे. त्यात त्यांना १२ महिन्यांहून अधिक काळ तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. एकदा निर्वासित झाल्यानंतर बेकर पुढील १० वर्षांसाठी यूकेमध्ये प्रवेशासाठी अर्ज करू शकणार नाही.