संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

‘माझ्याकडे पैशांची कोणतीही कमतरता नाही; प्रयागराजमध्ये बस हवेत उडताना दिसणार’

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

लखनौ – प्रयागराजमध्ये सी प्लेन सेवा सुरु करण्याचे आपले स्वप्न आहे, ज्यामुळे मी दिल्लीवरुन उड्डाण करुन संगमच्या पाण्यातून प्रयागराजमध्ये लँडिंग करू शकतो. लवकरच हेदेखील सत्यात उतरणार आहे. त्याचबरोबर हवाई बसचा डीपीआर तयार असून लवकरच हवेत उडणाऱ्या बस पहायला मिळतील, अशी घोषणा भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने नितीन गडकरी यांनी प्रयागराजमधील सभेला उपस्थिती लावली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, आता मी केशवजींना सांगितले आहे की, हवेत चालणाऱ्या बसचा डीपीआर तयार करत आहोत. प्रयागराजमध्ये रस्त्याच्या वर हवेत चालणारी बस चालवू. तुम्ही रस्ता तयार करुन घ्या. माझ्या विभागाकडे पैसा आहे. माझ्याकडे पैशांची कोणतीही कमतरता नाही. मी करोडोंमध्येच चर्चा करतो, असे नितीन गडकरी यावेळी म्हणाले. नितीन गडकरी यांनी यावेळी यासंबंधीच्या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार केला जात असून उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांना माहिती देण्यात आल्याचे सांगितले.

नितीन गडकरींनी यावेळी हायड्रोजन इंधनाचा वापर वाहनांमध्ये केला जाईल असे सांगितले. राज्यात मुबलक ऊस उपलब्ध होता, त्याच्या सहाय्याने इथेनॉलचा वापर वाहनातील इंधन म्हणून केला जाईल. इथेनॉलच्या वापरामुळे वाहनासाठी लागणाऱ्या इंधनाची किंमत कमी होऊन १०० रुपये लीटर पेट्रोलच्या तुलनेत ६८ वर येईल असा दावा नितीन गडकरींनी केला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami