तेहरान – इराणमध्ये एका 23 वर्षीय तरुणाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. इराणी सरकारविरोधात निदर्शने केल्याप्रकरणी त्याला ही शिक्षा देण्यात आली. मात्र या दोषी तरुणाने मरणापूर्वी एक मागणी केली.कोणीही माझ्या मृत्यूनंतर शोक व्यक्त करु नका आणि माझ्या कबरीजवळ कुराणही वाचू नका, असे सांगितले. त्याला मशहद शहरात माजिद्रेझा रहनावरदला सोमवारी सार्वजनिकरित्या फाशी देण्यात आली.
सुरक्षा दलाच्या एका सदस्याला जखमी केल्याप्रकरणी २३ वर्षीय मोहसिन शेकरीला फाशी देण्यात आल्यानंतर रहनावरदलाही फाशी देण्यात आली. याबाबत बेल्जियमच्या संसद सदस्य आणि महिला हक्क कार्यकर्त्या डारिया साफई यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे. ज्यामध्ये रहनवरदला त्याची शेवटची इच्छा सांगताना दाखवले आहे. व्हिडिओमध्ये, तो डोळ्यावर पट्टी बांधलेला आणि रक्षकांनी वेढलेला दिसत आहे. फाशीची शिक्षा भोगण्याअगोदर तो म्हणाला की, माझ्या थडग्यावर कोणीही शोक करावा असे मला वाटत नाही. कोणीही कुराण वाचावे किंवा प्रार्थना करावी असे मला वाटत नाही. तसेच फक्त उत्सव साजरा करा, असे आरोपी म्हणाला.त्यानंतर त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली.