पिंपरी- मातंग साहित्य परिषदेच्या वतीने आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पिंपरीतील काळेवाडी राजवाडा लॉन्स येथे उद्या रविवार 20 नोव्हेेंबर रोजी एक दिवसीय मातंगऋषी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 8 ते सायंकाशी 7 वाजेपर्यंत संपन्न होत आहे. ह्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष कोहिनूर ग्रुपचे प्रमुख, कृष्णकुमार गोयल हे आहेत. संमेलनाचे उद्घाटन डॉ. प्रशांत नारनवरे करणार आहेत. संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून समस्त साहित्य परिषदेचे मुख्य कार्यवाह प्रसन्न पाटील, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, ज्येष्ठ कवि उद्धव कानडे व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात विविध सत्रात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते संदीप पाठक यांची प्रकट मुलाखत साहित्यिक गणेश खंडाळे घेणार आहेत.