संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

माथाडींच्या संपामुळे 300 ट्रकमध्ये शेतमाल पडून! 7 कोटींचे नुकसान

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी मुंबई – एपीएमसी कांदा-बटाटा बाजारातील 50 किलो वजन हाताळणीचा तिढा अजून सुटलेला नाही. माथाडींनी जादा वजनाची गोणी उचलण्यास नकार दिल्याने वाशीच्या घाऊक बाजारात 300 ट्रकमध्ये सोमवारपासून शेतमाल पडून आहे. तो खराब होत असल्याने शेतकर्‍यांचे सुमारे 7 कोटींचे नुकसान होणार आहे. त्यामुळे या वादावर तोडगा कधी निघणार याकडे व्यापार्‍यांबरोबर शेतकर्‍यांचेही लक्ष लागले आहे. 50 किलोपेक्षा जास्त वजनाची गोणी उचलण्यात माथाडी कामगारांनी विरोध केल्यामुळे आणि ते सतत आंदोलन करत असल्याने व्यापार्‍यांनीही याच्या विरोधात बंदचा इशारा दिला होता. मात्र नंतर माथाडी कामगार आणि व्यापार्‍यांचे प्रतिनिधी यांच्यात गुरुवारी बैठक झाली. त्यात 50 किलोपेक्षा जास्त वजनाची गोणी उचलण्यास माथाडींनी संमती दर्शवली. त्यामुळे व्यापार्‍यांनी संप मागे घेतला. मात्र माथाडींनी पुन्हा 50 किलो पेक्षा जास्त गोणी उचलण्यास नकार दिल्याने सोमवारी वाशीच्या एपीएमसी बाजारात 300 ट्रकमध्ये शेतमाल पडून आहे. तो खराब होत असल्यामुळे शेतकर्‍यांचे सुमारे सात कोटींचे नुकसान होणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami