संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

माथेरानमध्ये ई–रिक्षा सुरू करा व्यापाऱ्यांचा पालिकेवर मोर्चा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कर्जत – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार माथेरानमध्ये ई-रिक्षा सुरू करावी या मागणीसाठी माथेरान व्यापारी संघटनेच्या माध्यमातून नुकताच माथेरान नगरपालिकेवर समर्थन मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सर्वपक्षीय संघटना आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
राज्य सरकारने ३ जून रोजी माथेरान पालिकेला ई-रिक्षा सुरू करण्याबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यास सांगितले होते.त्यानुसार त्यानंतर रायगड जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या सूचनेवरून ई-रिक्षा मॉडेलची क्षमता पाहण्यासाठी एक दिवसीय चाचणीही घेण्यात आली होती.या चाचणीत महिंद्र कंपनीची रिक्षा माथेरानच्या रस्त्यावर टिकू शकेल असा निष्कर्ष काढण्यात आला होता.मात्र या चाचणीवेळी पर्यटकांना घोडेसवारी उपलब्ध करून देणाऱ्या घोडेवाल्यांनी माथेरानमध्ये ई-रिक्षा सुरू करण्यास दोनदा प्रखर विरोध केला होता.त्यामुळे हा निर्णय प्रलंबित राहिला आहे.मात्र आता व्यापारी आणि नागरिकांनीच ए-रिक्षाची मागणी करत रत्यावर उतरण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे अखेर येत्या १५ ऑक्टोंबर पर्यंत माथेरानमध्ये व्यापाऱ्यांची ही मागणी पूर्ण केली जाईल असे आश्वासन पालिकेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.या मोर्चात शिवसेना,भाजप,कॉंग्रेस,आरपीआय,मनसे,शेकाप,शिवसेना शिंदे गट,तसेच धोबी समाज,दिव्यांग संघटना,गुजराती समाज,लॉजिंग चालक-मालक संघ्त्नासंघ्त्ना आणि सर्वधर्मीय समाजातील नागरिक सहभागी झाले होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami