संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

माध्यमिक शिक्षक संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयकपदी पांडुरंग काळे !

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सावंतवाडी- सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे माजी सेक्रेटरी पांडुरंग काळे यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाच्या (फेडरेशन) सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.पांडुरंग काळे यांच्या या निवडीबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते सभासद यांच्यावतीने अभिनंदन करण्यात येत आहे.
फेडरेशनच्या राज्य कार्यकारणीची सभा नुकतीच महात्मा फुले महा विद्यालय पिंपरी-पुणे येथे फेडरेशन अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित विषय व अन्यायी शासन निर्णय,यावर चर्चा होऊन प्रलंबित विषय सोडवण्यासाठी आंदोलन उभारण्याबाबत निर्णय घेण्यात आला.तसेच या राज्य कार्यकारिणी सभेत सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे माजी सेक्रेटरी, पांडुरंग काळे यांच्या संघटनात्मक व निष्ठापूर्वक कार्याची दखल घेऊन तसेच जिल्हा सेक्रेटरी पदावरील उत्तम कामगिरीचा विचार करून राज्य कार्यकारिणीने एक मताने सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक म्हणून पांडुरंग काळे यांची निवड करण्यात आली.या निवडी बाबतचे पत्र राज्य अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे व सेक्रेटरी शाळीग्राम भिरुड यांने पांडुरंग काळे यांना पाठवले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami