संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

मान सरकारच्या तिजोरीत खडखडाट! सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार रखडला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

चंदिगड – मोफत विजेची खैरात वाटणाऱ्या पंजाबमधील भगवंत मान सरकारच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे. त्यामुळे तेथील सरकारी कर्मचाऱ्यांचा ऑगस्टचा पगार ६ दिवस रखडला. ६ सप्टेंबरला त्यांना पगार मिळाला. यामुळे मान सरकार आर्थिक अडचणीत सापडले आहे.

पंजाब मध्ये सत्तेवर आलेल्या मान सरकारने काही घोषणा केल्या. त्याचा आर्थिक बोजा राज्याच्या तिजोरीवर पडला. मात्र त्या प्रमाणात उत्पन्न वाढले नाही. सरकारला जीएसटीतून १६ हजार कोटी मिळाले होते. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सरकारला हे उत्पन्न मिळाले. मात्र ३० जूनपासून ही प्रणाली बंद झाली. मार्चमध्ये मान सरकार सत्तेवर आले. तेव्हापासून कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या १ तारखेला दिला जात होता. कर्मचाऱ्यांच्या वेतनावर दरवर्षी ३१ हजार १७१ कोटी खर्च होतात. दरमहा २ हजार ५९७ कोटी पगारासाठी लागतात. मात्र यावेळी ऑगस्टचा पगार उशिरा झाला. कर्मचाऱ्यांना ६ तारखेला पगार मिळाला. अधिकाऱ्यांचा अजूनही पगार मिळालेला नाही. राज्य सरकार एक हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. त्यासाठी व्याजाचे पैसे मिळावेत या हेतूने पगार उशिराने दिले, अशी माहिती एका सरकारी अधिकाऱ्यांने दिली. सरकारवर मोफत विजेच्या बिलाचा १८ हजार कोटींचा बोजा आहे. याशिवाय दोन हजार कोटींच्या अन्य सबसिडी आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami