संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

माफीचा साक्षीदार होण्यास सचिन वाझे तयार; देशमुखांच्या अडचणी वाढणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने ईडीला मनी लाँड्रिंग प्रकरणात साक्षीदार बनण्याची तयारी दर्शवली आहे. तसे पत्रच सचिन वाझेने ईडीला लिहिले असून त्यात त्याने आपणास सीआरपीसी कलम ३०६, ३०७ अंतर्गत माफीचा साक्षीदार करून घेण्याची विनंती केली आहे.

चांदिवाल आयोगातही सचिन वाझे याने आपली साक्ष फिरवण्यासाठी अर्ज केला होता. मात्र आयोगाने तो फेटाळून लावला. आपण दबावापोटी अनिल देशमुख यांच्या बाजूने साक्ष दिल्याचे वाझेने आयोगासमोर दिलेल्या पत्रात म्हटले होते. तर दुसरीकडे ईडीने दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर अनिल देशमुख यांनी जामीनासाठी ईडी कोर्टात अर्ज दाखल केला आहे. त्यावर १४ फेब्रुवारीला सुनावणी होणार असून अशात वाझेने ईडीला लिहिलेल्या पत्रामुळे देशमुख यांना जामीन मिळतो का, हे पाहण महत्त्वाचे आहे. सचिन वाझे सध्या उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेल्या गाडी प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहे. तर अनिल देशमुख हेसुद्धा खंडणी वसुली आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. सचिन वाझेला माफीचा साक्षीदार व्हायचे असले तरी अंतिम निर्णय न्यायालयेकडे असतो. वाझे याने सक्षम न्यायदंडाधिकारी यांच्या उपस्थितीत साक्ष देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे आता केवळ अनिल देशमुख हे अडचणीत येणार की आणखी कोणी प्रमुख संशयित आरोपी अडचणीत येणार हे पाहावे लागणार आहे. वास्तविक, माफीच्या साक्षीदारामुळे एक किंवा जास्त आरोपींना शिक्षा होणार असेल तर संबधित व्यक्तीची शिक्षा माफ केली जावी किंवा शिक्षेत सवलत देण्याची मागणी तपास अधिकारी न्यायालयात करू शकतात. तरीही अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार न्यायालयाला असतो.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami