संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 21 May 2022

‘माफी मांगो राज ठाकरे…’ भोजपुरी गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email
Print

लखनऊ- मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी विरोध केल्यामुळे निर्माण झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही. आता उत्तर प्रदेशात सोशल मीडियावर ‘माफी मांगो राज ठाकरे…’ या भोजपुरी गाण्याने धुमाकूळ घातला आहे. महेश निर्मोही याच्या आवाजातील हे गाणे कवी योगेश दास शास्त्री यांचे आहे. संगीत बब्बन आणि विष्णू यांनी दिले आहे.
राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा बाजूला ठेवत हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन ते राजकीय मैदानात उतरले.

त्यांनी मुंबई, ठाणे, पुणे आणि औरंगाबादमध्ये सभा व इतर कार्यक्रम घेतले. त्यांच्या या भूमिकेने संपूर्ण राजकारण ढवळून निघाले. त्यात त्यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली. ५ जूनला ते अयोध्या दौरा करणार आहेत. मात्र त्यांच्या या दौऱ्याला भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना अपमानीत केले. त्यांना त्रास दिला. त्यामुळे ते जोपर्यंत उत्तर भारतीयांची माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली. त्यानंतर आता त्यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे गाणे उत्तर प्रदेशात सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. “कदम नहीं रखने देंगे, ये नेताजीने ठाना है, माफी मांगो राज ठाकरे… अगर अयोध्या आना है”, असे या गाण्याचे बोल आहेत. ते टिपीकल भोजपुरी स्टाईलमध्ये रेकॉर्ड केले आहे. महेश निर्मोही यांनी हे गाणे गायले आहे. योगेश दास शास्त्री यांनी ते लिहिले असून बब्बन आणि विष्णू यांचे त्याला संगीत आहे. या गाण्याच्या थंबनेलवर राज ठाकरे, बृजभूषण शरण सिंह आणि गीतकार यांचे फोटो आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami