रत्नागिरी – तालुक्यातील गणपतीपुळेपासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मालगुंड येथील समुद्र किनार्यावरून ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाची आणखी ३८६ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली आहेत. मालगुंडच्या निसर्गरम्य ठिकाण असलेल्या गायवाडी बीचवर ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या समुद्री कासवाच्या अंड्यांचे संवर्धन गेल्यावर्षीपासून सुरू आहे.
रत्नागिरीचे वनपाल गावडे तसेच रत्नागिरी जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मालगुंड गावच्या सरपंच श्वेता खेऊर आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहकार्याने ही पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. दरम्यान,ऑलिव्ह रिडले कासवांना गुहागर किनार्यावर सॅटेलाईट टॅगिंग करण्यात आले आहे. कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात आढळणार्या ऑलिव्ह रिडले कासवांचा समुद्रातील भ्रमण मार्ग शोधण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.गेल्या वर्षी पाच ऑलिव्ह रिडले कासवांना सॅटेलाईट टॅगिंग करण्यात आले होते. मात्र, ते सॅटेलाईट टॅग खराब निघाल्याने प्रकल्प अर्ध्यावरच राहिला होता