संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

माळशेज घाट परिसरात वाघाचा हैदोस! फटाके वाजवत रात्रभर जागता पहारा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुरबाड – मुरबाड तालुक्यातील माळशेज घाट परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघाचा हैदोस सुरू आहे.तालुक्यातील माळ वडाचीवाडीमध्ये तर वाघाने दोन बकऱ्यांचा फडशा पाडल्याने वाड्या-पाड्यातील आदिवासी बांधवांमध्ये या वाघाची मोठी दहशत दिसून येत आहे.त्यामुळे याठिकाणचे नागरिक रात्री फटाके वाजवीत जागता पहारा देताना दिसत आहेत.

या वाघाने वडाचीवाडी येथील रामा देऊ मेंगाळ यांच्या घरात घुसून दोन बकऱ्यांना आपले लक्ष्य केल्याची घटना घडली आहे.या परिसरात रात्रभर पाऊस कोसळत असल्याने वाघाचा शोध घेता आला नाही.मात्र वाघाच्या पायाचे ठसे दिसून आले आहेत.या घटनेची वनविभागाला दिल्यानंतर एक पथक तत्काळ पोहचले आणि त्यांनी तेथील परिस्थितीचा पंचनामा केला.मात्र यावेळी वनविभागाने वाघाला पकडण्यासाठी पिंजरा न आणल्याने आदिवासी बांधवांनी नाराजी व्यक्त केली.यावेळी लोकांनी फटाके वाजवावेत असा सल्ला वनविभागाने केला. त्यामुळे आता इथल्या वाड्या-वस्त्यांवरील लहान मुले आणि तरुण मंडळी फटाके वाजवीत रात्रभर जागता पहारा देत आहेत.
माळशेज घाट परिसरात नेहमीच वाघाचा उपद्रव होताना दिसत आहे.मात्र वनविभाग याबाबत फारसे गांभीर्य दाखवत नसल्याचा आरोप आदिवासी बांधव करत आहेत.एखादे जनावर किंवा माणसाचा बळी गेल्यानंतरच वनविभाग पिंजरे लावण्याची मोहीम हाती घेताना दिसत असल्याचे या नागरिकांचे म्हणणे आहे.या परिसरात दोन वाघांचा संचार वावर असल्याचे इथले आदिवासी बांधव चर्चा करताना दिसत आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami