संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 21 May 2022

मावळमध्ये आता थेट बैलांच्या ऑनलाईन रॅम्प वॉक स्पर्धेचे आयोजन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email
Print

पुणे- कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुन्हा एकदा बैलगाडा शर्यतींना स्थगिती दिली आहे. त्यामुळे सर्वांचाच भ्रमनिरास झाला आहे. मात्र पुन्हा एकदा बैलगाडा चाहत्यांच्या व शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर आनंद निर्माण करण्यासाठी मावळमधील बैलप्रेमी संतोष जांभुलकर यांनी थेट बैलांची एक अनोखी रॅम्प वॉक स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येत आहे. बैलगाडा प्रेमींनी या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. तर ही स्पर्धा अशी आहे की यात बैलजोडीचा चालतानाचा एक मिनिटांचा व्हिडिओ संपूर्ण कुटुंबासह काढायचा आहे. त्यानंतर बैलांचा गोठा कशा पद्धतीने बनवला आहे. त्यात बैलांच्या राहण्याची, खाण्याची, पिण्याची कशी सोय करण्यात आली आहे हे देखील या व्हिडिओ द्वारे दाखवायचे आहे.या स्पर्धेत शेकडो बैलगाडा प्रेमींनी सहभाग घेतला आहे. जी बैलजोडी अथवा बैलांची सजावट आकर्षक असेल अशा बैलांना किंवा बैलजोडीला विजेता घोषित करण्यात येणार आहे. यासाठी स्पर्धेत स्वतःचा बैल असणे बंधनकारक असणार आहे. त्याचप्रमाणे बैल हा सजवलेला, स्वच्छ असणे देखील तितकेच महत्त्वाचे असणार आहे.

विजेत्या बैलांची निवड ही त्याची चाल, शिंग, देखणेपणा, रुबाबदारपणा, वशिंड या निकषांवर निवडले जाणार आहे.मावळ तालुक्यात प्रथमच बैलांची रॅम्प वॉक स्पर्धा भरविल्यामुळे बैलगाडा प्रेमीं मध्ये एक वेगळेच नवचैतन्य आल्याचे पहायला मिळत आहे. त्यासाठी आपलाच बैल विजेता कसा होईल यासाठी मावळातील बैलगाडा प्रेमींनी कंबर कसली आहे. आता यात नेमका कोणता बैल प्रथम क्रमांक पटकवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami