मुंबई : माहिम वांद्रे येथील रेक्लिमेशन भागात खाडीलगत आज भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. खारफुटी परिसरात आग लागली असून परिसरात धुराचे मोठे लोट पसरले आहेत. मात्र, जीवितहानीबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आगीचे कारणही अद्याप कळू शकलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार,मुंबईतल्या माहिम वांद्रे खाडीलगत लागलेल्या आगीचे कारण अस्पष्ट आहे. आग लागली त्याठिकाणी मोठया प्रमाणात सुकलेले गवत होते त्यामुळे आगीने पेट घेतला. आणि धुराचे लोट मोठ्या प्रमाणात परिसरात पसरले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले.संपूर्ण परिसरात धूर पसरला असून जिवीत आणि वित्तहानीविषयी अद्याप कोणतीही माहिती स्पष्ट नाही.