संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

माहूरमध्ये महाविकास आघाडीत ठिणगी; राष्ट्रवादीचा कॉंग्रेसला मोठा धक्का

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नांदेड – माहूर नगरपंचायतीत महाविकास आघाडीत ठिणगी पडली आहे. राष्ट्रवादीची कॉंग्रेसला डावलून हाताशी घेतले आहे. याचे पडसाद आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे, असे बोलले जात आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनीदेखील तसेच संकेत दिले आहेत.

नांदेड जिल्ह्यात अर्धापूर, नायगाव आणि माहूर या तीन ठिकाणी नगर पंचायत निवडणुका झाल्या.अर्धापूर आणि नायगाव येथे काँग्रेसला बहुमत मिळाले. माहूरमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसला जास्त मते मिळाली. याठिकाणी हे दोन पक्षा एकत्र येतील असे वाटत होते.मात्र राष्ट्रवादीने काँग्रेसला बाजूला सारत शिवसेनेच्या नगरसेवकांना हाताशी घेतले आणि सत्ता स्थापन केली. यामुळे काँग्रेसला जबरदस्त धक्का बसला असून येथील काँग्रेसचे नेते संतप्त आहेत. आता कुठेच महाविकास आघाडी होणार नाही, असे बहुतांश कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.नांदेड जिल्ह्यात भाजपचे खासदार आणि तीन आमदार असले तरीही नांदेड शहरात भाजपची फार ताकद नाही.नांदेड महापालिकेवर काँग्रेसचे वर्चस्व आहे.८१ पैकी ७३ जागा काँग्रेसकडे आहेत. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेता, काँग्रेसने नांदेड शहरावर विकास डोळ्यासमोर ठेवून ८०० ते ९०० कोटी रुपयांचा निधी खेचून आणला आहे. जनतेला सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी काँग्रेस प्रयत्न करत असून महापालिकेत स्वबळावर निवडणूक लढवण्याचे काँग्रेसचे संकेत आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami