संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 01 April 2023

मी रविंद्र लक्ष्मीबाई धंगेकर
शपथ घेताना आईचे नाव लावले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- कसबा पोटनिवडणुकीत विजयी झालेले महाविकास आघाडीचे आमदार रवींद्र धंगेकर यांचा आज विधीमंडळात शपथविधी झाला. विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनता नवनिर्वाचित आमदार धंगेकरांनी आज शपथ घेतली. शपथ घेताना त्यांनी आपल्या नावापुढे आपल्या आईचे नाव लावले आहे. पिंपरी चिंचवड मतदारसंघातून नव्याने निवडून आलेल्या अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी चिंचवडच्या मतदारांसह स्व. लक्ष्मण जगताप यांचे स्मरण करून शपथ घेतली.
शपथ घेताना रवींद्र धंगेकर म्हणाले की, “मी प्रथम माझ्या कसबा विधानसभा मतदारसंघातील मतदारांना नमस्कार करतो. मी रवींद्र लक्ष्मीबाई उर्फ सुलोचना हेमराज धंगेकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने असा उल्लेख करत धंगेकरांनी शपथ घेतली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या