संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

मुंबईकरांच्या धरणांमध्ये 96.06 टक्के पाणीसाठा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात चांगला मुसळधार पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या धरणांमध्ये 96.06 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबईला 361 दिवस पुरेल इतका पाणीपुरवठा सध्या धरणात जमा झाला आहे. मुंबईची वर्षभराची तहान भागवायला आणखी 57,089 दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची गरज 96.06 आहे.

मुंबईमध्ये जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पाऊस पडतो. मात्र जून महिन्यात समाधानकारक पाऊस पडला नाही. 29 जूनपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. 29 जूनला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या 7 धरणांमध्ये 1 लाख 47 हजार 6 दशलक्ष लिटर म्हणजेच 10.16 टक्के पाणीसाठा होता. आज सकाळी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 13,90,274 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला आहे. धरणांमध्ये सध्या 96.06 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. सध्या धरणात 361 दिवसांचा पाणी साठा आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami