संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 08 August 2022

मुंबईकरांनो…सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबई, ठाण्यासह अनेक भागांत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे खबरदारी ठाणे जिल्ह्यातील शाळांना अतिवृष्टीमुळे पुढील २ दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर, मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, हवामान विभागाने मुंबईत आजही पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार, मुंबई शहर व उपनगरात मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडेल. काही ठिकाणी अति जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल. अधूनमधून ४५-५५ किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहतील. तसेच ६० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येते आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami