मुंबई – गेल्या काही दिवसांपासुन मुंबईकरांच्या अंगाची कडक उन्हाळ्याने लाहीलाही होऊ लागली आहे.मुंबईकरांना वैशाख वणव्याचे चटके सहन करावे लागत आहेत.मागील आठवडाभरापासून सरासरीपेक्षा अधिक पातळीवर स्थिरावलेल्या पाऱ्याने काल शनिवारी चांगलीच उसळी मारली.
काल मुंबईचे तापमान थेट ३८ अंशांवर पोहचले. यंदाच्या हंगामातील ही विक्रमी तापमान पातळी ठरली आहे.तर आज रविवारी मुंबईत कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस डिग्री इतके नोंदले गेले.
काल शनिवारी सांताक्रुझमध्ये कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. तर कुलाब्यात ६ अंशांची वाढ झाली. तर आज रविवारी मुंबईत कमाल तापमान ३६ अंश तर किमान तापमान २७ अंश डिग्री सेल्सिअस इतके होते.त्यामुळे मुंबईकरांची आजही
प्रचंड काहिली झाली. उत्तरेकडील वाऱ्यांचा वेग मंदावून पूर्वेकडून आलेले कोरडे वारे अधिक सक्रिय झाल्यामुळे मुंबईच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे.हवामान खात्याच्या अंदाजानुसार,येत्या २२ फेब्रुवारीपर्यंत मुंबईत तापमान चढेच राहणार आहे.शनिवारी सांताक्रुझमध्ये कमाल तापमान ७ अंशांनी अधिक होते,मात्र पहाटेच्या सुमारास मुंबईचे तापमान २० अंशांच्या खाली राहत असल्यामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळत आहे. शुक्रवारपाठोपाठ शनिवारी १९ अंश इतके किमान तापमान नोंदले गेले.