संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे नवरात्रीच्या नऊ रंगाने भरणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – यंदा मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या ठिकाणी नवरात्रीचे नवरंग सजणार आहेत.खड्डे बुजवण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून अंधेरी विमानतळ मेट्रो स्टेशन परिसरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांना काल पांढरा रंग देण्यात आला. स्वयंसेवी संस्थांनी घेतलेल्या पुढाकारातून नवरात्रीच्या नवरंगांचा वापर खड्डे दाखवण्यासाठी करण्यात येणार आहे. ‘पॉटहोल्स वॉरियर्स फाऊंडेशन’ आणि ‘वॉच डॉग’ संस्थांच्या माध्यमातून खड्ड्यात रंग भरून प्रशासनाचा अनोख्या पद्धतीने निषेध करण्यात येणार आहे.

आता मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या ठिकाणी नवरात्रीचे नवरंग अवतरणार आहेत.त्याचाच भाग म्हणून एअरपोर्ट स्टेशन रोडखाली पडलेल्या खड्ड्यांना आज सफेद रंग देण्यात आला. स्वयंसेवी संस्थांनी घेतलेल्या पुढाकारानुसार नवरात्रीच्या नवरंगांचा वापर खड्डे दाखवण्यासाठी करण्यात येणार आहे. खड्ड्यात रंग भरून प्रशासनाचा अनोख्या पद्धतीने निषेध करण्यात येणार आहे.प्रत्येक दिवसाच्या रंगानुसार मुंबईतील रस्त्यावरील खड्डे रंगवण्यात येणार असल्याची माहिती ‘पॉटहोल फाऊंडेशन’चे संस्थापक मुश्ताक अन्सारी यांनी दिली. काल पहिल्या दिवशी अंधेरीतील रस्त्यांवरील खड्डे पांढऱ्या रंगाने रंगवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

मुंबईच्या रस्त्यावर दररोज नवरात्रीच्या रंगाने खड्डे बुजवण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले.जनजागृती व्हावी आणि खड्ड्यांचा विषय मार्गी लागावा म्हणून पुढाकार घेतला असल्याचेही अन्सारी यांनी सांगितले. मुंबईतील खड्डे रंगवतानाच त्या ठिकाणी मदत करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.मुंबई महापालिकेने रस्त्यावरील खड्ड्यांची दखल घ्यावी म्हणून नवरात्रीचे रंग वापरल्याची माहिती अन्सारी यांनी दिली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami