मुंबई- मुंबईच्या पदपथावरील अतिक्रमण हटविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला मंगळवारी दिले. मुंबईतल्या फुटपाथवर दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अतिक्रमणाने नागरिकांचे हाल होत आहेत. सामान्य माणसांना चालण्यासाठी तयार केलेल्या पदपथांवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण होत आहे. ही अतिक्रमणे रोखण्यासाठी कोणत्या उपाय योजना करणार त्याविषयी 1 मार्चपर्यंत विस्तृत प्रतिज्ञापत्र सादर करा, असे आदेशही न्यायालयाने पालिकेला दिले. बोरीवलीतील गोयल प्लाझा शॉपिंग सेंटर मधील एका दुकानाचे मालक पंकज आणि गोपालकृष्ण अगरवाल यांनी ही याचिका दाखल केली होती.