संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

मुंबईतील एमएमपी शाह कॉलेजमध्ये हिजाब, स्कार्फ आणि बुरख्यावर बंदी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्यातील ज्युनिअर कॉलेजमध्ये हिजाब घालण्यावरून सुरु झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतूनही असेच प्रकरण समोर येताना दिसत आहे. मुंबईतील एसएनडीटी विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या एमएमपी शाह कॉलेजमध्ये बुरखा, स्कार्फ आणि घुंगटवर बंदी आहे. कॉलेज प्रशासनाने नियमावली पुस्तिकेमध्ये यासंदर्भात माहिती दिली आहे. काही विद्यार्थिनींच स्थानिक लोकप्रतिनिधींना याबाबतची माहिती दिली आहे.

मुंबईतील माटुंगा येथील एसएनडीटी विद्यापीठाद्वारे एमएमपी शहा महाविद्यालय चालवले जात असून येथील नियमांमुळे हे कॉलेज सध्या चर्चेत आहे. कारण हिजाब, स्कार्फ आणि बुरखा परिधान करणाऱ्यांना या कॉलेजमध्ये परवानगी नाही. कर्नाटकातील हिजाब प्रकरणानंतर आता हे कॉलेज वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. हे नियम कॉलेजच्या विवरण पुस्तिकेत आहेत. या नियमांनुसार कोणीही स्कार्फ, बुरखा आणि घुंगट घालून कॉलेजमध्ये प्रवेश करू शकत नाही. त्यामुळे आता या कॉलेजवर टीका होत आहे. कॉलेजवर झालेल्या टीकेनंतर कॉलेजच्या प्राचार्या डॉ.लीना राजे यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी म्हटले आहे की मुलींच्या सुरक्षेसाठी असे नियम कॉलेजच्या विवरणपत्रात लिहिलेले असतात.

पूर्वी मुले असे कपडे घालून मुलींना त्रास देत असत. हे लक्षात आल्यानंतर आम्ही हा नियम लागू केला असून याआधी नियमानुसार आम्ही मुलींना वर्गात बुरखा किंवा बुरखा काढायला सांगतो. तसेच मुलींना प्रवेश देताना आम्ही कोणताही धर्म किंवा जात विचारात घेत नाही. सर्व मुलींना बुरखा काढून टाकण्यास सांगितले जाते जेणेकरून त्यांना त्याच पद्धतीने शिक्षण घेता येईल.
या नियमाचा चुकीचा अर्थ लावला जात आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami