मुंबई – मुंबईकरांच्या चिंतेत वाढ करणारी बातमी आहे. मुंबईतील हवेचा दर्जा आणखी घसरला असून हवा प्रचंड दुषित झाली आहे. अहवालानुसार मुंबईतील हवेची गुणवत्ता अत्यंत खालावलेली आहे. मुंबईत काही ठिकाणी हवेच्या गुणवत्तेच्या निर्देशांकाने ३०० चा टप्पा ओलांडला तर काही ठिकाणी २०० चा टप्पा ओलांडला, ही पातळी अत्यंत खराब मानली जाते.
चिंताजनक बाब म्हणजे, मुंबईतील हवा प्रदूषणात पुन्हा दिल्लीपेक्षा जास्त वाढ झाली आहे.मुंबईची हवा गुणवत्ता निर्देशांक पातळी खराब असल्याचे नोंदवली आहे.सोमवारी मुंबईची एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक पातळी २२५ नोंदवण्यात आली. तर दिल्लीची एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक पातळी १५२ होती. ही आकडेवारी सफरची आहे ज्याने मुंबईची हवा गुणवत्ता निर्देशांक पातळी खराब असल्याचे नोंदवले आहे.मात्र मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या हवा गुणवत्ता निर्देशांक पातळीची नोंद झाली.मालाडमधील हवेची गुणवत्ता ३११ होती जी अत्यंत खराब आहे. त्यापाठोपाठ चेंबूरमध्ये ३०३ होते.वांद्रे-कुर्ला येथे हवा गुणवत्ता निर्देशांक पातळी २६९ नोंदवण्यात आली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळनुसार,काही दिवसांपूर्वी मुंबईतील हवेची गुणवत्ता १६८ (मध्यम) आणि दिल्लीतील २१८ (खराब) होती. आता सफरच्या आकडेवारीत मुंबईतील हवा दिल्लीपेक्षाही जास्त खराब असल्याचे समोर आले आहे