संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 03 July 2022

मुंबईत उंदीर मारण्यासाठी १ कोटी खर्च घोटाळा केल्याचा भाजपचा आरोप

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- मुंबई महापालिकेत उंदीर मारण्याचा घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजपने स्थायी समितीत केला आहे. मुंबईकरांचा त्रास दूर करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या किटक नाशक विभागाच्या माध्यमातून उंदरांचा नायनाट करण्यात येतो. उंदीर मारण्याबाबतचा २ कोटी रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी आला होता. त्यात ए ते टी विभागात म्हणजेच मुंबई शहर आणि पूर्व उपनगरात १ कोटी रुपये खर्च करून उंदिर मारण्यात आल्याचे म्हटले आहे. मुंबईकरांच्या पैशाची उधळपट्टी असून आणखी एक घोटाळा असून शिवसेनेचे घोटाळा करण्याची एकही जागा शिल्लक ठेवली नसल्याची बोचरी टीका भाजपचे पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.

प्रभाकर शिंदे यांनी म्हटले आहे की, एक उंदिर मारण्यासाठी २० रुपये तर ठरवून दिलेल्या संख्येपेक्षा अधिक उंदिर मारल्यास प्रत्येक उंदिर मारण्यास २२ रुपये या दराने उंदिर मारण्यात आल्याचे प्रस्तावात नमूद केले आहे. पालिकेने केवळ ५ वॉर्डमध्ये १ कोटी रुपये खर्च करून उंदीर मारले आहेत. मात्र किती उंदिर मारले ? विल्हेवाट कशी लावली? याची माहिती पालिकेने दिलेली नाही, या प्रस्तावात कोणतीही स्पष्टता नाही असेही प्रभाकर शिंदे यांनी म्हटले आहे. उंदरांच्या उत्पतीची कारणे कोणती ती सुद्धा प्रस्तावात दिलेली नाहीत. यामुळे नक्कीच उंदिर मारले गेले का यावर शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला.प्रभाकर शिंदे यांनी म्हटले आहे की, याविषयी सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश करण्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले. तसेच पुढील बैठकीत माहिती येईपर्यंत प्रस्ताव राखून ठेवला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami