मुंबई – कोरोना व्हायरसनंतर आता मुंबईत गोवरचा उद्रेक पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत गोवरचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला आहे. गेल्या दोन महिन्यांत मुंबईत गोवर रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत.काही मुले ही व्हेंटिलेटरवर असल्याचीही माहिती आहे. गोवरच्या वाढत्या प्रकरणांमुळे पालिका सतर्क झाली असून गोवरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.दरम्यान,काल बुधवारी मुंबईत १० गोवरच्या १० नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
त्यामुळे मुंबईतील गोवर बाधितांची संख्या ४७२ वर पोहचली आहे. तर दिवसभरात ३८ संशयित रुग्णांची नोंद झाल्याने ही संख्या ५ हजार १७ वर गेली आहे.सध्या दोन रुग्ण व्हेंटीलेटवर असून १५ रुग्ण ऑक्सिजन वर असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. मुंबईच्या गोवंडी परिसरात गोवरचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर गोवरचा झपाट्याने प्रसार होत आहे. मुंबईत ६२ ठिकाणी गोवरचा उद्रेक झाला आहे. भायखळा,वरळी,वडाळा, धारावी,अंधेरी पूर्व, कुर्ला , भांडुप,मालाड,चेंबूर,गोवंडी,
दहिसर या भागात गोवरचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत