संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 29 March 2023

मुंबईत मंगळवार व बुधवार 10 टक्के पाणी कपात

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मुंबईकर नागरिकांना विविध नागरी सेवा सुविधा देणारी आपली बृहन्मुंबई महानगरपालिका दररोज 385 कोटी लिटर इतक्या मोठ्या प्रमाणातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करीत असते. या पाणीपुरवठा यंत्रणेच्या तांत्रिक श्रृंखलेमध्ये पीसे येथील बंधार्‍याची महत्त्वाची भूमिका असते. याच पिसे बंधार्‍याच्या ‘न्यूमॅटिक गेट’च्या परिरक्षणाचे काम चालू असल्यामुळे मुंबईतील काही परिसरांमध्ये पाणी पुरवठ्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची आंशिक शक्यता लक्षात घेऊन पाणी जपून वापरण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे करण्यात आले आहे. पावसाळा कालावधीनंतर सालाबादप्रमाणे ‘न्यूमॅटिक गेट’चे परिरक्षण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असल्यामुळे पिसे बंधार्‍यातील पाण्याची पातळी ही साधारणत: 31 मीटर राखणे आवश्यक असते. या वर्षी पावसाळा लांबल्यामुळे सदर काम लवकर हाती घेता आले नाही. पाणी पातळी वाढविण्यासाठी पिसे बंधार्‍याच्या परिरक्षणाचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. यानुसार परिरक्षण कार्य हाती घेण्यात येत असल्यामुळे उद्या मंगळवार 18 ऑक्टोबर व बुधवार 19 ऑक्टोबर रोजी मुंबई शहर व उपनगरात 10 टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे, असे मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे सांगण्यात आले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या