संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

मुंबईत रात्रीची संचारबंदी हटवली, नवे नियम जारी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याने मुंबई महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील रात्रीची संचारबंदी हटवण्यात आली असून आजपासून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. तसेच, मुंबईतील सर्व पर्यटन स्थळं सुरू करण्यात आली आहे. त आहे. सोमवारी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या एक हजाराच्या खाली गेल्याने प्रशासनाने आवळलेले निर्बंध आता पुन्हा शिथिल करण्यास सुरूवात केली आहे.

काय आहेत नवे नियम?

मुंबईत रात्रीची संचारबंदी उठवली

मुंबईतली सर्व पर्यटनस्थळं सुरु होणार

स्पा आणि सलून 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार

अंत्यसंस्काराला उपस्थितीची मर्यादा नसेल

चौपाट्या, गार्डन, पार्क सुरू होणार

स्विमिंग पूल, वॉटरपार्क 50 टक्के मर्यादेने सुरू

रेस्टॉरंट, थेटर्स, नाट्यगृहे 50 टक्के मर्यादेने सुरू

धार्मिक आणि करमणुकीच्या कार्यक्रमांना 50 टक्के उपस्थितीची परवानगी

लग्नासाठी 25 टक्के उपस्थितीची मर्यादा

खेळाच्या मैदानात 25 टक्के उपस्थितीची मर्यादा

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami