संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 02 February 2023

मुंबईत सीटबेल्टचे नियम टॅक्सी संघटनां नाही अमान्य

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नियमातून वगळण्यासाठी वाहतूक पोलिसांना पत्र
मुंबई : वाहतूक पोलिसांनी चारचाकी वाहनांमध्ये येत्या १ नोव्हेंबरपासून सीटबेल्ट सक्ती केल्यानंतर कारवाईला विरोध करतानाच हा केंद्रीय मोटर वाहन नियमच अमान्य असल्याचे मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने मुंबईच्या सह पोलीस आयुक्तांना पाठविलेल्या पत्रातून नमूद केले आहे. सीटबेल्ट धोरण अंमलबजावणीची काळ्या-पिवळ्या टॅक्सीशी तुलना करु नये. यामध्ये अनंत अडचणी तसेच काही मुद्देही असून याची अंमलबजावणी होणे अशक्य असल्याचेही स्पष्ट केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चारचाकी वाहनांमध्ये मागच्या सीटवर बसणाऱ्या प्रवाशांना १ नोव्हेंबरपासून सीट बेल्टची सक्ती करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांनी काढले आहेत. वाहतूक पोलिसांनी केंद्रीय मोटर वाहन कायद्यानुसार येत्या १ नोव्हेंबरपासून चारचाकी वाहनात मागील आसनांवर बसलेल्या प्रवाशांनाही सीट बेल्ट लावणं बंधनकारक केले आहे. मागील आसनांवर बसलेल्या प्रवाशांनी सीट बेल्ट लावला नसेल तर चालकावर ५०० रुपये दंड आकारण्यात येणार असल्याने मुंबई टॅक्सीमेन्स युनियनकडून विरोध दर्शवत या नियमातून टॅक्सीला वगळण्यात यावे, अशी मागणी वाहतूक पोलिसांना केली आहे काळ्या-पिवळ्या टॅक्सी या मुंबई महानगरातच अधिक धावतात. त्यातून प्रवास करणारा प्रवासी हा कमी अंतरावरील असतो. टॅक्सीतून चार प्रवासी प्रवास करतात. तेथे मागील आसनावर बसलेल्या प्रवाशांसाठी दोन सीटबेल्ट दिलेले असतात. मागे बसलेल्या तीन प्रवाशांपैकी मधल्या आसनांवर बसलेल्या प्रवाशानेही सीटबेल्ट बांधणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे केंद्रीय धोरणाने खासगी टॅक्सीशी तुलना करु नये, असे मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने मुंबई सह पोलीस आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. मुंबई महानगरात टॅक्सीच्या अपघाताचे प्रमाण हे शून्य आहे. शहरात वाहनाचा सरासरी वेग हा १२ किलोमीटरपेक्षाही कमी आहे. हे मुद्दे विचारात घेता मागील आसनांवर बसलेल्या प्रवाशांना सीटबेल्ट सक्ती करु नये आणि हा केंद्रीय मोटर वाहन नियम काळ्या-पिवळ्या टॅक्सींसाठी लागू न करण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami