संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम सुसाट! रेल्वे मंत्रालयाची माहिती

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – केंद्र सरकारचा मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पास शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर येताच गती मिळाली आहे. रेल्वे मंत्रालयाने याबाबत सविस्तर माहिती दिली असून लवकरच हा प्रकल्प पूर्ण होईल अशी माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे.

रेल्वे मंत्रालयाने केलेल्या ट्विटनुसार, गुजरातमध्ये ९८.८ टक्के जमिनींचं हस्तांतरण करण्यात आलं असून, दादरा नगर हवेली येथे १०० टक्के तर महाराष्ट्रात ७५.२५ टक्के जमिनींचं हस्तांतरण झाले आहे. तसेच, १६२ किमीचे पायलिंगचे काम पूर्ण झाले असून ७९.२ किमीपर्यंत पिअर वर्कसुद्धा पूर्ण झाले आहे. तर, साबरमती येथे पॅसेंजर टर्मिनल हबचं काम जवळपास पूर्ण होत आले आहे. ठाकरे सरकारच्या काळात जमीन हस्तांतरण प्रक्रिया रखडली होती. या प्रकल्पाला त्यांचा विरोध होता, त्यामुळे सरकार या प्रकल्पाकडे दुर्लक्ष करत होते. दरम्यान, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी या कामाला गती दिली. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन ट्रेनमुळे मुंबई ते अहमदाबाद प्रवास अवघ्या काही तसांवर येणार आहे. बुलेट ट्रेन मुंबई, ठाणे, पालघरमार्गे गुजरातच्या वलसाड, नवसारी, सूरत, भारूच, वडोदरा, आणंद, खेडा आणि अहमदाबाद अशी धावणार आहे. मुंबई-अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेनचा वेग ३२० किमी प्रति तास असणार आहे. त्यामुळे अवघ्या तीन तासांत हे अंतर कापता येणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami