संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रक चालकाला बेदम मारहाण

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सिगारेट लुटणाऱ्या ट्रक चालकाचे अपहरण करुन ६ अज्ञात दरोडेखोरांनी बेदम मारहाण केली आहे. त्यातील १.३ कोटी रुपयांची सिगारेट लंपास केल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर एका ट्रकमधून 1.36 कोटी रुपयांची सिगारेट लुटली. याप्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपासाला सुरूवात केली. त्याचवेळी सिगारेट लुटणाऱ्या ट्रकला कारमधील दरोडेखोरांनी सकवार गावाजवळ अडवले.त्यांनी ट्रक चालकाला बेदम मारहाण केली आणि त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली. ट्रकमध्ये भरलेली 1.3 कोटी रुपयांची सिगारेटची खेप रिकामी केल्यानंतर त्यांनी ट्रक सोडून तिथून पळ काढला.त्याबरोबरच त्या ट्रक चालकाला बेदम मारहाणही केली.हा ट्रक नवी मुंबईतील रबाळे येथून जयपूरच्या दिशेने जात होता’, अशी माहिती मांडवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांनी दिली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami