संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

मुंबई आणि जामनगर येथून १२० कोटींचे मेफेड्रोन जप्त! एनसीबीची मोठी कारवाई

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला पुन्हा मोठे यश मिळाले आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबई आणि गुजरातमधून १२० कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे ६० किलो मेफेड्रोन जप्त केले आहे आणि या प्रकरणात एअर इंडियाच्या माजी पायलटसह सहा जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. गुजरातमधील जामनगर येथे नौदल गुप्तचर युनिटला मिळालेल्या विशिष्ट इनपुटच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती शुक्रवारी एनसीसीबी उपमहासंचालक संजय सिंह यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली.

एनसीबीचे उपमहासंचालक एसके सिंह यांनी शुक्रवारी माहिती देताना सांगितले की, हे एमडी ड्रग मुंबई आणि जामनगर येथील गोदामातून जप्त करण्यात आले आहे. खबऱ्याच्या माहितीवरून गोदामावर छापा टाकण्यात आला. एनसीबीने या अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत मुख्य सूत्रधारासह सहा जणांना अटक केली. एनसीबीचे डीडीजी सिंह म्हणाले की, सुरुवातीला जामनगरच्या नौदल इंटेलिजन्स युनिटने एमडी ड्रग्जच्या विक्री आणि खरेदीची माहिती दिली होती. या माहितीवरून एनसीबी आणि नेव्हल इंटेलिजन्स युनिटने संयुक्तपणे कारवाई केली. या माहितीवरून जामनगर येथून
१०.३५० किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले.

डीडीजी सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनगरमध्ये अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींपैकी एक सोहेल महर गफीता २०१६ ते १८ दरम्यान एअर इंडियाचा पायलट होता. जामनगर आणि मुंबईतील जप्त अमली पदार्थ प्रकरणाशी संबंध असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. जप्त करण्यात आलेल्या एमडी ड्रगचे एकूण वजन ६० किलो असल्याचे त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत १२०0 कोटी रुपये आहे. एनसीबी मुख्यालय दिल्ली आणि मुंबई झोनल ऑफिसने ३ ऑक्टोबर रोजी जामनगरमध्ये छापा टाकला होता. मुंबईतून जामनगर येथून प्रत्येकी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. दक्षिण मुंबईतील एसबी रोड फोर्ट परिसरातील गोदामातून ५० किलो एमडी ड्रग जप्त करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami