संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ३६ तासांनतर सुरू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

रत्नागिरी- मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा पुलावर अपघात झालेल्या टँकरमधील गॅस काढल्यानंतर या महामार्गावरील वाहतूक तब्बल ३६ तासानंतर आज पहाटे २.३० च्या सुमारास सुरू झाली. त्यामुळे वीकेंडला कोकणात जाणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील आंजणारी येथील काजळी नदीत गॅसचा टँकर कोसळून अपघात. गुरुवारी दुपारी २.४५ च्या सुमारास झालेल्या या अपघातात टँकर चालकाचा मृत्यू झाला. एलपीजी गॅस वाहतूक करणारा हा टँकर गोव्याकडे जात होता. पुलाचा कठडा तोडून तो नदीत कोसळला. त्यानंतर टँकरमधून एलपीजी गॅस गळती सुरू झाली. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काल दुपारपासून सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद ठेवली होती. मुंबई-गोवा महामार्ग बंद झाल्यामुळे प्रवासी आणि वाहन चालकांची मोठी गैरसोय झाली होती. येथील वाहतूक लांजा मार्गे वळवली होती. अपघातानंतर गोवा आणि उरण येथील तज्ञांची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी टँकरमधील गॅस काढण्याचे काम हाती घेतले. हे काम आज पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास पूर्ण झाले. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami