संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

मुंबई -गोवा महामार्गावर अपघात; १४ जण जखमी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : गोवा महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. मुंबई -गोवा महामार्गावरील हमरापूर फाटा ब्रीजवर हा अपघात घडला आहे. या अपघातामध्ये १४ जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. टेम्पो ट्रॅव्हलर व ट्रेलरमध्ये हा अपघात झाला. टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये एकूण २२ प्रवासी होते, २२ प्रवाशांपैकी एकूण १४ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर पेनच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर हमरापूर फाटा ब्रिजवर आज पहाटे दोन वाजता अपघात झाला. टेम्पो ट्रॅव्हलर आणि ट्रेलरमध्ये हा अपघात झाला. टेम्पो ट्रॅव्हलर खेडवरून मुंबईकडे जात असताना हमरापूर ब्रिजवर बंद पडलेल्या कॉईल ट्रेलरला मागून धडकले. या अपघातामध्ये एकून १४जण जखमी झाले. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच कल्पेश ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधित जखमी लोकांना रुग्णवाहिकेतून तातडीने पेनच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami