संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

मुंबई डबेवाल्यांच्या सायकल चोर्‍या उपमुख्यमंत्री फडणवीसांना दिले पत्र

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- मुंबईची जीवनरेखा बनलेले डबेवाले आजकाल त्यांच्या सायकल चोऱ्यांमुळे बेजार झाले आहेत. या संदर्भात आपली कैफियत मांडण्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सायकल स्टँड परिसरात गस्त वाढविण्याची विनंती केली आहे. या संदर्भात रेल्वे स्टेशन बाहेर पार्क केलेल्या डबेवाल्यांच्या सायकली चोरीस जाण्याचे प्रमाण खूप वाढल्याचे व त्यातही विलेपार्ले, नालासोपारा आणि बोरीवली भागात हा त्रास खूप असल्याचे नमूद केले गेले आहे.
कोरोनामुळे डबेवाल्यांना अगोदरच खूप नुकसान सोसावे लागले आहे. त्यात आता सायकल चोऱ्यांची भर पडल्याने हे नुकसान सोसणे अशक्य बनल्याचे त्यांचे म्हणणे आहे.दरम्यान,
डबेवाला असोसिएशनचे सुभाष तळेकर या संदर्भात बोलताना म्हणाले, डबेवाल्यांचे ये-जा करण्याचे मुख्य साधन सायकल हेच आहे.आजकाल सायकली महाग आहेत. जरा बरी सायकल १० हजाराच्या खाली येत नाही. सायकली मोठ्या प्रमाणावर चोरीला जात आहेत आणि त्यामुळे आमच्या रोजच्या कामात अडचणी येत आहेत परिणामी कमाईवर परिणाम होत आहे.स्वयंसेवी संस्थांकडून सायकली मिळविण्याचे प्रयत्न केले जात आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami