संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गाचा टोल १२०० रुपये! फलक लावला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नागपूर- महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला मुंबई ते नागपूर हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग अनेक वैशिष्ट्यांनी युक्त आहे.तसेच गेल्या काही वर्षांमध्ये राजकीय वादात सापडलेल्या या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लवकरच उद्घाटन केले जाणार असून त्याआधी या महामार्गावरून जाणार्‍या वाहनांना किती टोल भरावा लागणार आहे याची सविस्तर माहिती देणारा फलक महामार्गाच्या कडेला लावण्यात आला आहे. यामध्ये चारचाकी वाहनांना साधारण १२०० रुपये टोल भरावा लागणार असल्याचे दिसून येते.
या महामार्गाच्या उद्धाटनानंतर मुंबई ते नागपूर हे ७०१ किलोमीटरचे अंतर वेगाने पार करता येणार आहे.आता पहिल्यांदाच या महामार्गावर भराव्या लागणाऱ्या टोलची आकडेवारी समोर आली आहे. तशा प्रकारच्या लावलेल्या फलकाचा फोटो सध्या व्हायरल होऊ लागला आहे.या महामार्गावरील टोलचे हे दर ३१ मार्च २०२५ पर्यंत अर्थात पुढील जवळपास तीन वर्षांसाठी लागू असतील,असे या फलकावर नमूद करण्यात आले आहे.या फलकावर नमूद केलेल्या दरांनुसार, साध्या चारचाकी वाहनांसाठी,अर्थात कार्ससाठीचा टोल या फलकावर नमूद करण्यात आला आहे. त्यानुसार, या महामार्गावर प्रवास करणाऱ्या चारचाकी गाड्यांसाठी प्रतिकिलोमीटर १.७३ रुपये टोलची वसुली करण्यात येणार आहे.
त्यामुळे मुंबई पासून थेट नागपूरपर्यंत ७०१ किलोमीटरचा पूर्ण प्रवास करणाऱ्या चारचाकी गाड्यांना जवळपास १२०० रुपये टोल भरावा लागणार आहे.वाहन प्रकार आणि त्यासाठी लागणार टोल याचीही माहिती या फलकावर देण्यात आली आहे.त्यामुळे मुंबई पासून थेट नागपूरपर्यंत ७०१ किलोमीटरचा पूर्ण प्रवास करणाऱ्या चारचाकी गाड्यांना जवळपास १२०० रुपये टोल भरावा लागणार आहे. वाहन प्रकार आणि त्यासाठी लागणार टोल याचीही माहिती या फलकावर देण्यात आली आहे.मोटर,जीप, व्हॅन अथवा हलकी मोटर वाहने – १.७३ रुपये प्रतीकिमी, हलकी व्यावसायिक वाहने, हलकी मालवाहतुकीची वाहने अथवा मिनी बस- २.७९ रुपये प्रतिकिमी, बस अथवा ट्रक- ५.८५ रुपये प्रतिकिमी असा टोला आकारण्यात येणार आहे. तसेच तीन आसांची व्यावसायिक वाहने ‌- ६.३८ रुपये प्रतिकिमी, अवजड बांधकाम यंत्रसामग्री, अनेक आसांची वाहने-९.१८ रुपये प्रतिकिमी, अतिअवजड वाहने (सात किंवा जास्त आसांची)- ११.१७ रुपये प्रतिकिमी असे दर असणारा फलक लावण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, ७०१ किमी लांबीच्या दर ५० किमी अंतरावर १५ महामार्ग सुरक्षा पोलीस ठाण्यांची उभारणी केली जाणार आहे.हा समृद्धी महामार्ग १० जिल्हे,२६ तालुके आणि ३९२ गावांमधून जातो. ताशी १२० किमी या वेगाने या द्रुतगती मार्गावर वाहने धावणार आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami