संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

मुंबई – नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात १० फुटांचे तडे

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

संरक्षक कठडे सरकत चालले

मुंबई- मुंबई – नाशिक महामार्गांवरील कसारा घाटासह पडघा ते गोंदे दरम्यान महामार्गावर मोठ मोठ्या खड्ड्यांना चुकवत प्रवाशांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो. त्यातच आता कसारा घाटातील रस्ताच खचत चालला असून महामार्गांवर काही अंतरावरील रस्त्याला पूर्णपणे तडे गेल्याने रस्ता दबला गेला आहे.रस्त्याच्या कडेला असलेले संरक्षक कठडेदेखील रस्ता सोडून बाजूला सरकले गेले आहेत.
मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्ग असलेल्या मुंबई- नाशिक दरम्यानच्या जुन्या कसारा घाटाची निकृष्ठ दर्जाचे काम आणि पडणाऱ्या पावसामुळे कसारा घाटाची वाट पुरता बिकट वाट बनत चालली आहे.महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या कसारा घाटात २०२० च्या पावसाळ्यात कसारा जुना घाट आणि नवीन घाटातील दोन्ही मार्गिकेवर मोठ्या प्रमाणात रस्ता खचला होता परिणामी काही दिवस महामार्गावरिल् वाहतूक एकेरी सुरु ठेवण्यात आली होती.आता जुन्या कसारा घाटात रहदारी मोठ्या प्रमाणात असते त्यातच ५०० मिटरचा रस्ता खचला आहे. अनेक मोठ्या भेगा या रस्त्यावर पडल्यात दरम्यान रस्त्यावर पडलेल्या भेगा,तडे यात पाणी जाऊन भराव खचण्याची शक्यता मोठ्याप्रमाणात आहे. दरम्यान मुंबई नाशिक महामार्गावरील वडपे ते गोंदे रस्त्याची चाळण झाली आहे.खड्ड्यामुळे अनेक आपघात झाले आहेत तर कसारा घाटात खड्ड्यांची रांगोळी आहेच पण कसारा घाटाच्या नागमोडी वळणावर आणि खोल दरीत जाण्यापासून संरक्षण व्हावे यासाठी असलेले संरक्षण कथडे पूर्ण तुटून गेलेले आहेत.त्यामुळे मुंबई नाशिक हा टोल रस्ता प्रवाशांच्या जीवावरच उठल्याचे बोलले जात आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami