मुंबई:- मुंबई महापालिकेच्यावतीने शहरातील विविध ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. पवईतील तुंगा भागातील क्लिनिकच्या जागेवर भूमाफियांनी ताबा मिळवला होता. तसेच क्लिनिकच्या बाहेर बाऊन्सर उभे करून टाळे लावण्यात आले होते. आज पालिकेचे अधिकाऱ्यांनी क्लिनिकचे टाळे तोडले आणि भूमाफियांची घुसखोरी उधळून लावली.
मुंबईमधल्या पवई इथल्या तुंगा परिसरामधील क्लिनिकमध्ये भूमाफियांनी घुसखोरी केली होती.या घुसखोरीचा विरोध करणाऱ्यांना मारहाण करण्यासाठी या भूमाफियाने आपले बाऊन्सर्स या क्लिनिकमध्ये उभे केले होते. या विरोधात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी तक्रार केली होती. याबाबत महानगर पालिकेचे अधिकारी म्हणले की, ही जागा महानगर पालिकेची आहे. या जागेवर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना सुरू आहे.मात्र अज्ञात व्यक्तीकडून ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. हे बाब गंभीर आहे. अज्ञात व्यक्तीकडून रुग्णालयाला टाळे लावण्यात आले होते. मात्र हे टाळे तोडून आम्ही या रुग्णालयाचा ताबा घेतला आहे.पवईतील पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.