रायगड -मुंबई-पुणे महामार्गावरील बोरघाटात भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने ६ वाहनांना धडक दिली. त्यात ट्रक चालकासह अनेक जण जखमी झाले. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
मुंबई-पुणे महामार्गावरील बोरघाटात ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे त्याने ६ वाहनांना धडक दिली. या विचित्र अपघातात ट्रक चालक आणि अन्य वाहनांमधील अनेक जण जखमी झाले. अपघातामुळे घाटातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. जखमींवर प्रथमोपचार करून त्यांना सोडले. त्यानंतर पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला हटवल्यावर येथील वाहतूक पुन्हा सुरू झाली.