संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

मुंबई महापालिकेत भाजप नगरसेवकाचे पद रद्द!

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- महापालिका प्रभाग क्रमांक 159 मधून निवडून आलेले भाजप नगरसेवक प्रकाश मोरे यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचे आदेश लघुवाद न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे याच ठिकाणी दुसर्‍या क्रमांकाची मते मिळालेल्या शिवसेना उमेदवार कोमल जामसांडेकर यांना हे नगरसेवकपद देण्याचे आदेश न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत. प्रकाश मोरे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये माहिती लपवल्याची तक्रार कोमल जामसांडेकर यांनी केली होती आणि त्यांच्या याच तक्रारीवर निर्णय देताना लघुवाद न्यायालयाने प्रकाश मोरे यांचे नगरसेवकपद रद्द केले आहे. दरम्यान, सध्या मोरे यांच्या वकिलाने या आदेशाविरोधात वेळ मागून घेतला आहे. तसेच कोमल यांना नगरसेवक पद मिळाले तरी आता पालिका निवडणुका काही दिवसातच होणार असल्याने त्यांना नगरसेवक कालावधी अवघ्या काही दिवसांचा मिळणार आहे. कारण 7 मार्चला सभागृहाचा कार्यकाळ संपणार1 असून पालिकेवर प्रशासक नेमला जाणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami