मुंबई- भाजप आमदार प्रविण दरेकर पुन्हा बँकेचे अध्यक्ष होणार झाले आहे.उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांची निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांच्या निवडीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेना उधाण आले आहे. निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी दोघांमध्ये सेटिंग होती का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
सिद्धार्थ कांबळे यांनी गेल्या आठवड्यात अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. तर विठ्ठल भोसले यांनी उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. प्रवीण दरेकर यांचे अवघ्या सहा महिन्यांत मुंबई बँकेच्या अध्यक्ष पदावर पुनरागमन झाले आहे. सहा महिन्यांपूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या या बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे प्रवीण दरेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असतानाच मुंबई बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांनी सूत्रे हलवत भाजपाला धक्का दिला होता.शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसकजे एकूण 11 संचालक होते, तर भाजपकडे 9 संचालक होते. त्यामुळे महाविकास आघाडीकडे संख्याबळ जास्त होते. त्यामुळे महाविकास आघाडीचे सिद्धार्थ कांबळे हे विजयी झाले होते, त्यांनी भाजपच्या प्रसाद लाड यांचा पराभव केला होता.