संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 01 April 2023

मुकेश अंबानीनी पुत्र आकाशसोबत
सोमनाथ महादेवाचे दर्शन घेतले !

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सूरत – देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आपला मुलगा आकाश याच्यासोबत महाशिवरात्रीनिमित्त गुजरात येथील सोमनाथ मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले.यावेळी दोघा पितापुत्रांनी सोमनाथ महादेवाचा रुद्राभिषेकही केला. त्याचप्रमाणे दर्शन घेतल्यानंतर अंबानी कुटुंबाच्या वतीने सोमनाथ मंदिर ट्रस्टला १.५१ कोटी रुपयेही दान करण्यात आले.
सोमनाथ मंदिरात दर्शनासाठी आलेल्या मुकेश अंबानी आणि आकाश अंबानी यांचे मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष पी.के. लाहिरी आणि सचिव योगेंद्र देसाई यांनी स्वागत केले. दोघांचेही मंदिर ट्रस्टतर्फे शाल व चंदनाचे लेप देऊन स्वागत करण्यात आले. मुकेश अंबानी आणि आकाश अंबानी यांनी सोमनाथ महादेवाची विधिवत पूजा केली आणि त्यांनी भोलेनाथाचा रुद्राभिषेकही केला. त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये मुकेश अंबानी फिकट गुलाबी तर आकाश अंबानी फिकट निळ्या रंगाच्या कुर्त्यात दिसत आहेत. फोटो पाहून सर्वजण अंबानी कुटुंबाचे कौतुक करताना दिसत आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या