संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

मुकेश अंबानी सिंगापूरमधून रिलायन्सचा कारभार चालवणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे आता सिंगापूरमध्ये बसून कंपनीचा कारभार चालवणार आहेत. रिलायन्सला ग्लोबल बनवण्याच्या हालचाली त्यांनी सुरू केल्या आहेत. त्यासाठी सिंगापूरमध्ये ते कौटुंबिक कार्यालय सुरू करणार आहेत. त्यासाठी त्यांनी जागाही पाहिली आहे, अशी माहिती ब्लूमबर्गने सूत्रांच्या हवाल्याने दिली.
सिंगापूर हे जगभरातील अब्जाधिशांचे आवडते ठिकाण आहे. कमी कर आणि सुरक्षा यामुळे सिंगापूरमध्ये अनेक बड्या कंपन्यांची कौटुंबिक कार्यालये आहेत. हेज फंडचे अब्जाधीश रे डॅलिओ आणि गुगलचे सह-संस्थापक सेर्गे ब्रिन अगोदरपासूनच सिंगापूरमध्ये आहेत. श्रीमंतांच्या वाढत्या संख्येमुळे सिंगापूरमध्ये कार, घरे आणि इतर वस्तुंच्या किमती वाढत आहेत. २०२० पर्यंत सिंगापूरमध्ये ४०० बड्या कंपन्यांची कार्यालये होती. २०२१ मध्ये त्यांची संख्या ७०० झाली. आता रिलायन्सही तेथे कार्यालय थाटणार आहे. त्यामुळे ती जागतिक कंपनी होणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami