संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पुण्यातील‘ डुप्लिकेट’वर पोलिसांत गुन्हा दाखल

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – शिवसेनेतील बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांनी राज्यात भाजपासोबत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यानंतर त्यांच्यासारखा हुबेहुब दिसणारा व्यक्ती सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. विजय नंदकुमार माने असे त्याचे नाव असून आतापर्यंत त्याने एकनाथ शिंदे यांच्यासारखा पोषाक परिधान करून अनेक सोहळ्यांमध्ये हजेरी लावली आहे.त्यावेळी अनेकांनी त्याच्या उपस्थितीला चांगले पसंत केले.मात्र आता याच मुख्यमंत्र्याचा डुप्लिकेट असलेल्या विजय मानेवर एका सराईत गुन्हेगारांबरोबर फोटो काढल्याने पुण्यात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
विजय माने याने चेहऱ्यावर वाढवलेली दाढी,कपाळावर टिळा आणि व्हाईट शर्ट आणि पॅन्ट असा पोषाख परिधान केल्यामुळे तो हुबेहुब एकनाथ शिंदे यांच्यासारखा दिसतो. मात्र, विजय माने यांच्यावर पुणे पोलिसांनी सऱ्हाईत गुन्हेगार शरद मोहोळ याच्यासोबत फोटो सेशन केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पोषाख परिधान करून सऱ्हाईत गुन्हेगार शरद मोहोळ सोबत फोटो सेशन केले होते. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. व्हॉटसॲप व फेसबुक या सोशल मीडियावर अधिक माहिती घेतल्यावर पोलिसांना एक फोटो मिळाला. फोटो पाहिल्यावर सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे असून सराईत गुन्हेगार शरद मोहोळ हा खुर्चीत बसला असल्याचे दिसत आहे. हा फोटो नीट पाहिल्यावर तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नसून तो विजय माने याचा असल्याचे निष्पन्न झाले. लोकांमध्ये गैरसमज पसरविण्याच्या उद्देशाने त्याने हे कृत्य केल्याचे दिसत असल्याने खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायदान्वये गुन्हा दाखल केला असून संबंधित प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, विजयराज माने या पुण्यातील आंबेगाव पठार येथील तरूणाला गणेशोत्सव काळात अनेक सुपाऱ्या मिळाल्याच्याही चर्चा होत्या.अनेक गणेश मंडळे त्याला आरतीसाठी निमंत्रण देत होती. काही दिवसांतच स्टार झालेल्या या तरूणाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपल्या परिसरातील प्रश्न मांडले आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami