संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

मुख्यमंत्री केसीआर यांच्याकडून ‘भारत राष्ट्र समिती’ पक्षाची घोषणा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

हैदराबाद- तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आज दसर्‍याच्या मुहूर्तावर नवीन राष्ट्रीय पक्षाची घोषणा केली आहे. राव यांनी त्यांच्या तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाचे नाव बदलून ‘भारत राष्ट्र समिती’ असे नाव केले आहे. केसीआर यांच्या या घोषणेमुळे त्यांच्या कार्यकत्यार्र्ंत आनंदाची लाट उसळून आली आहे. केसीआर यांचे हे पाऊल बीआरएसच्या राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करण्याच्या आणि भाजपशी प्रभावीपणे सामना करण्याच्या पक्षाच्या प्रयत्नांचा एक भाग असल्याचे बोलले जात आहे.

केसीआर यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय पक्ष सुरू केला आहे. हे मोठे पाऊल उचलण्यापूर्वी त्यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, केरळचे पिनाराई विजयन आणि ओडिशाचे नवीन पटनायक यांची भेट घेतली होती. त्यानंतर पक्षाच्या 280 हून अधिक कार्यकारी सदस्य, आमदार आणि खासदारांनी तेलंगणा राष्ट्र समितीचे भारत राष्ट्र समिती (बीआरएस) मध्ये विलिनीकरण करण्याचा ठराव मंजूर केला होता. त्यानुसार आज दसर्‍याच्या मुहुर्तावर मुख्यमंत्री केसीआर यांनी आपल्या पक्षाच्या मुख्यालयात ‘भारत राष्ट्र समिती’ या राष्ट्रीय पक्षाची घोषणा केली. याप्रसंगी के चंद्रशेखर राव यांनी सांगितले की, तेलंगणा राष्ट्रीय समिती आता ‘बीआरएस’ म्हणून ओळखली जाईल. म्हणजे भारत राष्ट्र समिती असे राष्ट्रीय पक्षाचे नाव आहे. यावेळी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी आणि द्रमुकचे सहयोगी थोल थिरुमावलम उपस्थित होते. केसीआर यांच्या या घोषणेनंतर हैदद्राबादमध्ये त्यांच्या कार्यकत्यार्र्ंनी गुलाल उधळत एक जल्लोष केला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami