संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

मुख्यमंत्री नितीशकुमार
दिल्ली दौर्‍यावर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पाटणा – बिहारमध्ये भाजपपासून वेगळे झाल्यानंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी महाआघाडीसोबत नवे सरकार स्थापन केले. या राजकीय उलथापालथीनंतर नितीशकुमार आज दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीला रवाना होण्यापूर्वी राबडीदेवी यांच्या निवासस्थानी आरजेडी सुप्रीमो लालूप्रसाद यादव यांची त्यांनी भेट घेतली. या बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, माजी मुख्यमंत्री राबडीदेवी हेही उपस्थित होते. नितीशकुमार यांच्या दिल्ली दौर्‍यापूर्वी लालू प्रसाद यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. नितीश यांना दिल्लीत अरविंद केजरीवाल, राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांना भेटणार आहेत. जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष लालन सिंह व मंत्री अशोक चौधरी हेही त्यांच्यासोबत दिल्लीला जाणार आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami