संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 30 January 2023

मुख्यमंत्री शिंदे गडचिरोली दौर्‍यावर
पोलिसांसोबत दिवाळी साजरी केली

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

गडचिरोली – तत्कालीन मविआ सरकारमध्ये गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून यशस्वी कामगिरी बजावल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुन्हा एकदा गडचिरोली दौर्‍यावर आले होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे यांनी पहिल्यांदाच गडचिरोलीत येत नक्षलवाद्यांशी दोन हात करणार्‍या जवान आणि पोलिसांसोबत दिवाळी साजरी केली. त्यानंतर छत्तीसगडच्या बॉर्डरवरील जंगलात येऊन मुख्यमंत्री शिंदेेंनी सुरक्षा व्यवस्थेचीदेखील पाहणी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नागपूर विमानतळावरून हेलिकॉप्टरने थेट भामरागड तालुक्यातील दुर्गम अशा धोडराज येथे दाखल झाले. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस महासंचालक रजनीश शेठ, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी धोडराज पोलीस मदत केंद्राच्या आवारात आदिवासी नागरिक आणि पोलीस जवानांना साहित्य, फटाके

आणि फराळ वाटप करून त्यांच्यासोबत संवाद साधत दिवाळी साजरी केली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, नक्षलवाद्यांमुळे विकासात्मक कामांत अडथळे येत आहेत. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी नक्षलवाद संपवणे गरजेचे आहे.
मी या जिल्ह्याचा पालकमंत्री असतानाही दुर्गम भागांत येत होतो. त्यामुळे तुमच्याबाबत मला आस्था आहे. तुमच्या विविध समस्यांचीही जाणीव आहे. त्या दूर करण्याचा मी निश्चित प्रयत्न करीन. दिवाळीसारख्या सणाला आपल्या घरापासून दूर राहणार्‍या, आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणार्‍या पोलीस दलासोबत दिवाळी साजरी करणे ही समाधानाची बाब आहे. पालकमंत्री असताना पोलिसांसोबत दिवाळी साजरी करीत होतो. आता हळूहळू गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद संपत आहे. शहरी नक्षलवाद ही समस्या असून, याकडे सरकार गांभीर्याने लक्ष घालत असल्याची माहितीही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami