संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

मुदखेड तालुक्यात टेम्पो पलटी 3 व्यवसायिकांचा जागीच मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नांदेड – मुदखेड तालुक्यातील राजवाडी गावाजवळ आठवडी बाजाराहून हिमायतनगरकडे जाणारा टेम्पो पलटी होऊन 3 व्यवसायिकांचा जागीच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो पलटी झाला. 7 जण जखमींना मुदखेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

मुदखेड येथील व्यापारी हे जिल्हाभरात सर्व आठवडी बाजार करतात. अनेक व्यापारी भाजीपाला, धान्य, आदी साहित्य विकण्यासाठी एका वाहनाने नेहमी तालुकास्तरावर असलेल्या आठवडी बाजारासाठी जातात. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी हिमायतनगर येथील आठवडी बाजारसाठी मुदखेडचे व्यापारी टेम्पोमधून हिमायतनगरकडे जात होते. हा टेम्पो मुदखेड ते भोकर रस्त्यावर असलेल्या राजवाडीजवळ एका वळणावर खड्डा चुकवताना टेम्पो चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटला आणि टेम्पो उलटला. त्यात 3 व्यवसायिकांचा जागीच मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच, सोनखेड पोलीस ठाण्यातील सहायक पोलिस निरिक्षक भोसले, पोलिस उपनिरीक्षक परिहार, पोलीस कर्मचारी श्याम बनसोडे, अंगद कदम, उत्तम कांबळे या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन, मुदखेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami