मुरबाड- सध्या मुरबाड शहर आणि तालुक्यात विविध ठिकाणी क्रिकेटचे सामने भरवले जात असून या सामन्याच्या मैदान परिसरात पणती पाकोळी नावाच्या जुगाराची चलती सुरू असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.कोणत्याही प्रकारची कायदेशीर मान्यता नसलेला हा जुगार लॉटरीचा हा प्रकार असून तो खेळण्यासाठी तरुणांची मोठी गर्दी दिसून येते.
ज्याठिकाणी क्रिकेटचे सामने भरवलेले असतात त्याच परिसरात असे पाकोळी जुगाराचे अड्डे आढळून येत असल्याचे बोलले जाते. यामध्ये स्वतःचा सोफ्टवेअर बनवून परदेशी लॉटरी खेळली जाते.त्यासाठी परवाना असल्याचे नुसते भासवलेले असते. या जुगार खेळासाठी महिन्याकाठी दोन लाखांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले जाते.त्याला कायदेशीर परवानगी नसते.विशेषतः क्रिकेट सामन्याच्या ठिकाणीच हा पाकोळी जुगार चालत असल्याने यात प्रामुख्याने तरुण पिढीच गुंतलेली दिसून येते.